राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात महिलेचा मृत्यू

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.

 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, शेख शरीफ त्यांच्या पत्नी मरीयमबी शेख शरीफ (वय ४० रा खिरोदा प्र यावल) एमएच १७ १६०९  मोटरसायकलने बुरहानपुर कडे जात होते. रावेर नजिक पंजाबशहा बाबाजवळ माघुन येणाऱ्या बुलेरो सीटर (यूपी १२ बीफ ५८४४) ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या मरीयम शेख यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहीती समजताच मुस्लिम पंच कमेटी सदस्य गयास शेख गयासुद्दीन काझी, अब्दुल रफिक शेख़ सादिक मेंबर यांनी ग्रामीण रुग्णालय गाठत मदत केली.

Protected Content