राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीच्या समितीत एकनाथ खडसेंचा समावेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अध्यक्ष निवडीच्या समितीत एकनाथ खडसेंचा समावेश करण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्याचे वृत्त आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवार हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असून लवकरच राष्ट्रवादीला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात शरद पवार यांनी एक समितीची नियुक्ती केली असून यात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबख आदी मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. ही समिती अध्यक्षपदाची निवड करणार आहे.

 

दरम्यान, या समितीत आमदार एकनाथराव खडसे यांची देखील नियुक्ती करण्यात यावी अशा सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत. या अनुषंगाने प्रफुल्ल पटेल यांनी खडसे यांना फोन करून मुंबईला तातडीने बोलावले आहे. यानुसार, एकनाथराव खडसे हे मुंबई येथे रवाना झाले आहे. राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांच्या समितीत आता खडसे यांना देखील स्थान मिळाल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

Protected Content