यावल येथे घर फोडून चोरीचा प्रयत्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महाजन गल्ली परिसरात अज्ञात चोरट्यांची बंद घरफोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटनासमोर आली आहे. घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलीसांनी घेतली धाव.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की सतिष उर्फ नितिन मधुकर धनोरे  (वय  ४४ वर्ष ) यावल एसटी आगारात वाहक म्हणुन कार्यरत असलेले राहणार महाजन गल्ली हे आपल्या कुटुंब मागील १५ दिवसापासुन अहमदाबाद ( गुजरात )येथे नातेवाईकाकडे गेले असता , त्यांचा बंद घरपाहुन अज्ञात चोरटयांनी दिनांक १९ मे२०२३  रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराला फोडून चोरीच्या उद्देशाने घरातील कपाट व इतर सामान्यची फेकाफेक केली.

 

याबाबत त्यांच्या घराजवळच राहणार उमेश रेवा फेगडे यांनी दुरध्वनीवरून धनोरे कुटुंबाकडे विचारणा केली असता घरात कुठल्याही प्रकारचे दागीने किंवा पैसे घरात नसल्याचे त्यांनी सांगीतले. घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीसांनी भेट देवुन पंचनामा केल्याचे वृत्त आहे . मागील काही दिवसापासुन चोऱ्यांचे प्रमाण वाढले असुन पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी यावल शहरवासीयांकडुन होत आहे .

Protected Content