यावल कृउबा समितीच्या सभापती व उपसभापती यांची निवड घोषीत

सभापतीपदी भाजपाचे हर्षल पाटील तर उपसभापतीपदी शिंदेगटाचे दगडू कोळी बिनविरोध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे हर्षल गोविंदा पाटील यांची तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाये दगडू (बबलु) जर्नादन कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणुकीत भाजपा शिंदे गटाच्या महायुतीचे १८ पैक्की १५ संचालक निवडुन आले होते. गुरूवारी १८ मे रोजी सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी बैठक निवडणुक निर्णय अधिकारी एफ पी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.  यात सभापतीपदाची धुरा महायुतीच्या भाजपाचे हर्षल गोविंदा पाटील यांची तर उपसभापतीपदी शिवसेना ( शिंदे गट ) चे दगडु जर्नादन कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली

 

या बैठकीस संचालक हर्षल पाटील , नारायण चौधरी , राकेश फेगडे , उज्जैनसिंग राजपुत , विलास चंद्रभान पाटील , उमेश पाटील , संजय पाटील , सागर महाजन ,पंकज चौधरी . कांचन फालक, यशवत तळेले, राखी बऱ्हाटे, सुर्यभान पाटील , दगडु कोळी, अशोक चौधरी ,सुनिल बारी, सैय्यद सैय्यद युसुफ, माजी सभापती हिरालाल चौधरी , हर्षल पाटील , नरेन्द्र नारखेडे , पुरूजीत चौधरी आदी उपस्थित होते. बैठकीस भरतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव , भाजपा युवा मोर्चाचे सागर कोळी , माजी पंचायत समिती उपसभापती दिपक अण्णा पाटील , सरपंच अजय भालेराव , फैजपुरचे माजी नगराध्यक्ष निलेश (पिंदू ) राणे , भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे , देवीदास धांगो पाटील ,शिवसेना शिंदे गटाचे तुषार मुन्नाभाऊ पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , व्यकंटेश बारी परिष नाईक व पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . बैठकीचे सुत्रसंचालन व आभार भाजपाचे तालुका सराचिटणीस विलास चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content