यावल आगारातून रात्रीच्या बससेवेच्या वेळेत बदल करण्याची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल आगारातून रात्री १०.३o वाजेनंतर भुसावळ आणी यावल ते पुणे जाणारी रातराणी प्रवाशांना जाण्यासाठी एसटी बस नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने नागरीकांच्या समस्याचे निराकरण व्हावे यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि तालुका प्रवाशी संघटनेच्या वतीने आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांना तक्रार निवेदन देण्यात आले आहे.

 

निेवेदनात म्हटले आहे की, आपल्या यावल एसटी आगारातुन प्रतिदिन यावल ते भुसावळ जाण्यासाठी रात्री ९.३oवाजे नंतर भुसावळ बससेवा नसल्याने व ही बस चुकल्यास प्रवाशांना भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असल्याने या ठीकाणाहुन पुढील रेल्वेच्या प्रवाशाघेवुन अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान रात्री १o.३० वाजेनंतर बाहेरून विविध रेल्वेने प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री यावल कडे येण्यासाठी देखील बससेवा नसल्याने रात्री भुसावळच्या बस स्थानकावर प्रवाशांसाठी धोकादायक असलेल्या बसस्थानकावर थांबावे लागते . त्याच बरोबर यावलच्या बस स्थानकावरून रात्रीच्या प्रवाशांसाठी सुटणारी यावल पुणे एसटी सायंकाळी सुटणारी ४ वाजेची रातराणी बससेवाच्या सुरू असुन ही बस शिवाजीनगर बसस्थानकावर रात्री २ .३०ते ३ वाजेच्या सुमारास पहोचणाऱ्या प्रवाशांना उपनगरातील बसस्थानकावर रात्रीच्या वेळेस स्थानीक शहर बस सेवा उपल्बध नसते अशा वेळेस प्रवाशांना बसस्थानकावर २ते ३ तास ताटकळत बसावे लागते किंवा अव्वा की सव्वा भाडे देवुन आपला प्रवास करावा लागतो. अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते, तेव्हा प्रवाशी सकाळच्या सुमारास पहोचतील याकरीता पुणे रातराणी बससेवेच्या वेळेत दुपारच्या ४ वाजेच्या वेळेत बदल करून सायंकाळी ६ वाजेची करावी अशी मागणी केली आहे.

 

निवेदन देतांना  यावल शहर शिवसेना ( उबाठा ) व प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्यासह संतोष धोबी , शिवसेना तालुका उपप्रमुख व कृउबाचे संचालक सुनिल बारी , शरद कोळी , पप्पू जोशी , आदीवासी शिवसेनेचे हुसैन तडवी , डॉ. विवेक अडकमोल ,सागर देवांग , प्रकाश धोबी , योगेश चौधरी , ईलीयास खान, विजय पंडित , भरत राजपुत , विभागप्रमुख प्रविण लोणारी आदी उपस्थित होते.

Protected Content