मोबाईल नंबर देण्याच्या कारणावरून कुटुंबातील तीन जणांना मारहाण

पहूर लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । मोबाईल नंबर दुसऱ्याला दिल्याच्या कारणावरून पत्नी व मुलासह एकाला काठीने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात बुधवार १७ मे रोजी दुपारी १ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर दामू गव्हाणे (वय-५६, रा. लेले नगर, पहुर ता. जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी गावात राहणारा बाळू गव्हाणे याचा मोबाईल नंबर एकाला दिला होता. या कारणावरून बाळू उर्फ भाऊसाहेब पांडुरंग गव्हाणे रा. संतोषी माता नगर ,पहुर याने ज्ञानेश्वर दामू गव्हाणे, त्यांची पत्नी अलका ज्ञानेश्वर गव्हाणे आणि त्यांचा मुलगा अजय ज्ञानेश्वर गव्हाणे या तीन जणांना लाकडी काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शेतात काम करत असताना १५ मे रोजी दुपारी ३ वाजता घडला आहे.  याप्रकरणी ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवार १७ मे रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी बाळू उर्फ भाऊसाहेब पांडुरंग गव्हाणे यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ भरत लिंगायत करीत आहे.

Protected Content