जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण शिवारातील सर्व्हे नंबर ३४३ ही गायरान जमीन आहे. ही जमीन क्रीडा संकुल व इतर वापरास देण्यात येवून नये अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने शुक्रवारी २६ मे रेाजी दुपारी ४ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील मेहरूण शिवाराती सर्व्हे नंबर ३४३ ही गायरान वापरास आरक्षित करण्यात आले आहे. या जागेवर आता महसूल विभागाच्या वतीने तालुका क्रीडा संकुल उभारण्याकरीत देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी स्थानिक शेतकरी व गावकरी यांचा ही गायरान देण्यास तीव्र विरोध करीत आहे. या भागात गुरे ढोरे चारण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने गुरांना चारण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. याच परिसरात जळगाव येथील प्रसिध्द मेहरूण तलाव असून या जागेवर क्रीडा संकुल उभारल्यास व बांधकाम झाल्यास तलावात येणारा पाण्याचा स्त्रोत बंद होवून भविष्यात तलावाचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. याठिकाणी विविध पशुपाांचे अस्तित्व असल्याने ते देखील नाहीसे होणार आहे. ही क्षेत्र शांतता व पर्यावरण क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. या अचडणी लक्षात घेवून ही गायरान जागा सोडून इतर ठिकाणी क्रीडा संकुलासाठी भुखंडाचा विचार करावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी, राजु मोरे , किरण राजपुत , राहुल टोके , हितेशभाऊ जावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.