मुक्ताईनगरात शिवसेनेत ‘इनकमींग’ : राष्ट्रवादीला धक्का

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शेख सलीम वहाब मनियार यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यशैलीने तसेच विकास कामांनी प्रभावित होऊन मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच अल्पसंख्याक समाजाचे नेते शेख सलीम शेख वाहब मनियार (ठेकेदार) यांनी काल रात्री आपल्या समाज बांधव व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

यावेळी शिवसेनेचे छोटू भोई, प्रफुल्ल पाटील, शिवाजी पाटील, गणेश टोंगे, वसंत भलभले, नगरसेवक निलेश शिरसाट, नूरमोहम्मद खान, युनूस खान, सलीम खान , हारून शेख, जाफर अली, शकुर जमदार, मुशिर मनियार, संतोष माळी, गौरव दुट्टे, शरीफ खान, साबीर पटेल यांचेसह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 

याप्रसंगी अल्पसंख्याक समाजाचे नेते शेख सलीम शेख वाहब मनियार (ठेकेदार)  यांचेसह शेख शोएब शेख सलीम, शेख साबीर शेख सादिक, शेख फरीद शेख आबिद, वाजिद अहमद खान, आसिफ शेख बाबू, शेख नूर शेख सलीम, नितीन सावळे, शेख रफिक, शेख शाहकरम,शेख सोहील , शेख अकबर ,शेख शाहरुख,अब्दुल शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच असंख्य मुस्लिम समाज बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Protected Content