महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक…

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा पंधरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार निदर्शने केली.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content