जळगाव, प्रतिनिधी । कुसुंबा जकात नाका ते विमानतळ या महामार्गावर पथदिवे व गतिरोधक बसविण्यात यावी अशी मागणी जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे निवेदनाद्वारे करण्यात आली.
औरंगाबाद महामार्गावर रोज होणाऱ्या अपघातांची मालीका लक्षात घेता या महामार्गावर गतीरोधक व रात्रीचे अपघात टाळण्यासाठी दुतर्फा हायमस्ट L.E.D.लाईट बसविण्यात यावे यासाठी निवेदन देवून जनतेच्या व्यथा मांडण्यात आल्या, याप्रसंगी तालुका अध्यक्ष मनोज डिंगबर चौधरी , प्रमोद घुगे , उप अध्यक्ष समाधान पाटील, सचिन माळी, रविंद्र सोनवणे , संजय पाटील, सागर कुंटुंबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.