मला देखील होती भाजप प्रवेशाची ऑफर ! : अनिल देशमुख

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्याला आधीच भाजप प्रवेशाची ऑफर होती, याला स्वीकारले असते तर दोन वर्षाआधीच महाविकास आघाडी सरकार कोसळले असते असा गौप्यस्फोट आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

 

अनिल देशमुख यांनी आज वृत्त वाहिनीशी बोलतांना मोठा गौप्यस्फोट केला आहे.  ते म्हणाले की, मी गृहमंत्री असतांनाच मला भारतीय जनत पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर मंजूर केली असती तर तेव्हाच महाविकास आघाडी सरकार पडले असते. मात्र आपण असे केले नाही. आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. याचमुळे मला तुरूंगात जावे लागले असे देशमुख म्हणाले.

 

अनिल देशमुख यांना कथितरित्या १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात दीर्घ काळ कारागृहात रहावे लागले होते. जामीन मिळाल्यानंतर काही काळ शांत राहिल्यानंतर ते आता सक्रीय झाले असून त्यांनी भाजपला लक्ष्य करत टिका केली आहे.

Protected Content