मंदिराचा लाईट सुरु न झाल्याने वृद्धाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हर्षवर्धन कॉलनीमध्ये मंदिराचा लाईट सुरु न झाल्याच्या कारणावरुन वृद्धाला शिविगाळ करुन लोखंडी पट्टीची चौकट वृद्धाच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केल्याची घटना  घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील हर्षवर्धन कॉलनीत दिलीप रामदास शिंपी (वय-६६) हे वृद्ध वास्तव्यास आहे. मंगळवार २ मे रोजी सायंकाळच्या सुमारास संशयित लक्ष्मण वेडू मराठे यांनी शिंपी यांना मंदिराची इलेक्ट्रीक फिटींग तु कशी काय केली. हा लाईट का सुरु होत नाही असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मंदिराच्या आवारात पडलेली लोखंडी पट्टीची चौकट वृद्धाच्या डोक्यात घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वृद्धाच्या तक्रारीवरुन संशयित लक्ष्मण वेडू मराठे रा. हर्षवर्धन कॉलनी यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहे.

Protected Content