भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, भुसावळचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाचा इयत्‍ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण तर ४५ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले.

 

शाळेतील आदर्श अशोक सिंग याने ९७ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम येण्याचा क्रमांक पटकाविला. तसेच मिता किरण वानखेडे हिने ९६.२ टक्के, ओम सचिन पाटील ह्याने ९६, अभिजीत राजु मोरे याने ९५ टक्के गुण प्राप्त केले. याशिवाय संस्कृती सिद्धाराम बागलकोटी, आकांक्षा अशोक मिश्रा यांनी ९४.६ टक्के गुण तर सार्थक निलेश खांडवेकर याने ९४.४ टक्के, क्रिष्णा पद्माकर कुलकर्णी व आर्यन दिनेशसिंग राजपूत, ग्रेसी सतिश चांदवाणी यांनी ९४.२ टक्के, अक्षय प्रदिप पाटील याने ९१.८, अमित सुनिल अहिरराव याने ९०.४ तर ओम जयंत देशमुख या विद्यार्थ्याने ९०.८ टक्के गुण प्राप्त केले. डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका अनघा पाटील यांच्यासह शिक्षकवृंदानी अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content