भीषण अपघात प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औरंगाबाद रोडवरील पाळधी गावाजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव वेगाने येणारा डंपर आदळल्याने चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता पहूर पोलीस ठाण्यात कंटनेर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकदेव रघुनाथ पाटील (वय-४१) रा. खेडी खुर्द ता. एरंडोल जि.जळगाव असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, सुकदेव पाटील हा डंपरवर चालक म्हणून कामाला होता. २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता डंपर (एमएच ०६ बीडी ५८८८) ने जळगावहून पहूरकडे जात होता. पाळधी गावाजवळील हॉटेल अजिंठा गार्डन समोर (एमएच ३८ एए ८८८२) हा महामार्गावरील रस्त्यावर मधोमध उभा होता. त्यावेळी भरधाव वेगाने येणार डंपर थेट कंटनरवर आदळला. या अपघातात सुकदेव पाटील हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकारणी पहूर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.पी. बनसोड करीत आहे.

Protected Content