भीषण अपघातात दुसऱ्या तरूणाचाही उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कानळदा रोडवरील के.सी.पार्क जवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुसऱ्या तरूणाही बुधवारी १ मार्च रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. यातील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल प्रकाश विसपूते (वय-३०) रा. कांचन नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून कानळदा येथील के.सी.पार्क जवळ मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गणेश सोमा सपकाळे (वय-३२) रा. आमोदा खुर्द ता.जि.जळगाव याचा जागीच मृत्यू झाला होता. यातील समाधान बाविस्कर रा. आमोदा खुर्द ता.जळगाव, जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपूते रा. कांचन नगर, जळगाव असे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. यातील अमोल प्रकाश विसपूते याचा उपचारादरम्यान बुधवार १ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कांचन नगरातील मित्र परिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती. मयत अमोल हा रेमंड कंपनीत कंत्राटी पध्दतीने कामाला होता. गेल्या पाच दिवसांपासून रेमंड कंपनी बंद असल्याने अमोल घरीच होता. तो मित्रासोबत बाहेर गेला होता. तेव्हा हा अपघात घडला आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

Protected Content