भाजयुमोच्या वतीने काँग्रेसच्या विरोधात जोडेमारो आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयात भारतीय जनता युवा मार्चाच्या वतीने बुधवारी २४ मे रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची राहुल गांधी सोबत तुलना करणाऱ्या काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मह पोस्टला जोडेमारो व घोषणाबाजी करून तीव्र निषेध करण्यात आला.

 

भारतीय जनता पार्टीने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असून महाराजांची राहुल गांधी सारख्या दीड दमडीच्या अक्कल शुन्य नेत्याशी तुलना होऊच शकत नाही असे असताना देखील काँग्रेस पक्षाने हे कृत्य केले आहे. याचा निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविला तसेच त्यांनी तो व्हीडिओ डिलीट करून माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी यावेळेस जिल्हा भाजपा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, आनंद सपकाळे  जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, उपाध्यक्ष स्वामी पोतदार, सचिन बाविस्कर, विक्की सोनार, राहुल मिस्तरी, राहुल लोखंडे, गणेश महाजन, चिटणीस रोहित सोनवणे, सागर जाधव, मंडल अध्यक्ष दिनेश पुरोहित, शिवा खंडारे, पंकज गागडे, समर्थ राणे, मंडल पदाधिकारी निर जैन, हेमंत भंगाळे, शाखाध्यक्ष महेश पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content