भाऊंच्या उद्यानासमोर उभी दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भाऊंच्या उद्यानासमोर उभी दुचाकी लांबवल्याप्रकरणी शनिवार, १७ जून रोजी दुपारी २ वाजता  रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी योगेश भोजू पाटील हा तरुण वास्तव्यास आहे 10 जून रोजी रात्री सव्वा सात वाजता योगेश हा भाऊंच्या उद्यानात आला होता . यादरम्यान त्याने त्याची एम एच 19 सीएस ०२६४ या क्रमांकाची दुचाकी भाऊंच्या उद्यानासमोर उभे केली. आठ वाजता परतल्यानंतर त्याला त्याची दुचाकी दिसून आली नाही इतरत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने सात दिवसानंतर शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास विजय खैरे हे करीत आहेत

Protected Content