भडगावातून नायब तहसिलदारांच्या दुचाकीची चोरी

भडगाव तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदारांची राहत्या घरासमोरून अज्ञात चोरटयांनी त्यांची होंडा शाईन कंपनीची दुचाकी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शहरातील महसूल कॉलनी (शिवाजी नगर) येथे वास्तव्यास असलेले भडगाव तहसिलचे नायब तहसिलदार राजेंद्र अहिरे त्यांच्या मालकिची होन्डा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्र.एम.एच १९ डि.जे १७७५ ही असुन ते ती वापरत असतात.

 

राजेंद्र अहिरे यांनी दिनांक २३ मार्च २०२३ रोजी रात्री ११.४५ वाजता त्यांच्या भडगांव महसुल कॉलनी जवळ येथील घरासमोरील गेटसमोर लावलेली होन्डा शाईनमोटार ही लॉक करुन लावली होती.  यानंतर अहिरे हे घरात झोपण्यासाठी निघून गेले असता २४ मार्च रोजी रोजी सकाळी ५ वा.चे सुमारास त्यांना जागेवर मोटारसायकल दिसून आली नाही. याबाबत आजूबाजूला परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही त्यामुळे दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे यांनी भडगाव पोलिस स्टेशनला धाव घेऊन त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.हे.कॉं तात्याबा नागरे हे करीत आहेत.

Protected Content