भंगार विक्रेत्याला मारहाण करून रोकड जबरी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भंगार विक्रेत्याला मारहाण करीत त्याच्याजवळील तीन हजारांची रोकड जबरदस्तीने लुटल्याची घटना मंगळवार ११ जून रोजी सकाळी १० वाजता दशरथ नगर परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या तासाभरात शनिपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयीत भोलासिंग जगदिशसिंग बावरी (रा. शिखलकर वस्ती, तांबापुर) याच्या कालिंका माता चौफुलीजवळून मुसक्या आवळल्या. दोन दिवसांपुर्वीच कारागृहातून बाहेर येताच त्याने पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली आहे.

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील समीर रमजान तडवी हा मंगळवार ११ जून रोजी सकाळी १० वाजता भंगार खरेदी करण्यासाठ गेला होता. जूने जळगावातून तो दशरथ नगरकडे जात असतांना त्याला भोलासिंग बावरी या दिसला. त्याने तडवी याला तु भंगार लेता क्या, तेरे पास कितने पैसे है असे विचारले. त्यावर तडवी याने दो तीन हजार रुपये है असे म्हणत तो तेथून जाण्यासाठी निघाला. यावेळी बावरी याने कित्ते पैसे है मै गिनता हू असे म्हणला, त्यानंतर भंगार मोजण्याचा काटा उचलून तो लोटगाडीवर देखील ठेवला. तडवी याने पैसे देण्यास नकार दिला असता, भोलासिंग बावरी याने तडवी याला कारच्या मागचे ओढत नेवून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातून जबरदस्तीने ३ हजार रुपये हिसकावून तो तेथून पसार झाला. पळून जातांना तो तू इधरसे मत जावो आगे हमारी गँग खडी है असे म्हणून तो तेथून पळून गेला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना संशयित भोलासिंग बावरी हा कालंका माता चौकात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोकॉ राहूल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे यांचे पथक रवाना केले. या पथकाने अवघ्या तासाभरात सराईत गुन्हेगार भोलासिंग बावरी याला अटक केली.

Protected Content