बेपत्ता दोन्ही बालकांना अवघ्या काही तासातच पोलिसांनी शोधून काढले

सुखरूप पालकांच्या केले स्वाधीन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील दोन बालक गुरुवार, १८ मे रोजी सकाळी ११ वाजता खेळता खेळता बेपत्ता झाली होती. एमआयडीसी पोलिसांचा सतर्कतेने अवघ्या काही तासातच दोन्ही बालक सुखरूप मिळून आले असून दोघेही बालकांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

रायपूर कुसुंबा गावात गुरुवारी सकाळी कार्तिक जयसिंग परदेशी वय ६ वर्ष, आणि प्रियासू अजयकुमार वर्मा वय ४ वर्ष अशी दोन्ही एकत्र खेळत होती. खेळता खेळता दोन्ही ही अचानक बेपत्ता झाली. कुटुंबियांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. दोघेही अल्पवयीन असल्याने तसेच दोघांपैकी कार्तिक हा मूकबधिर असल्याने कर्मचाऱ्यांकडून तातडीने शोध सुरू करण्यात आला होता. याच दरम्यान कानळदा रोड परिसरातील लक्ष्मी नगर मधील रिजवान शेख गणी यांना दोघे बालक हे एमआयडीसी तील साईनगर येथे दिसून आली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , इम्तियाज खान, इमरान सय्यद, सचिन पाटील , निलोफर सय्यद, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने दोन्ही बालकांना ताब्यात घेतले. प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार, एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत दोन्ही बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघेही बालक सुखरूप मिळाल्याने याबद्दल पालकांनी एमआयडीसी पोलिसांच्या आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content