बील देण्याच्या कारणावरुन हॉटेल मॅनेजरला मारहाण करत केले जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वावदडा येथे हॉटेल प्रधान परमीट रुम व बीयरबार येथे बील देण्याच्या कारणावरुन एकाने हॉटेल मॅनेजरला मारहाण करत जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी एका जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव तालुक्यातील वावदडा येथे हॉटेल प्रधान परमीट रुम व बीयरबार आहे. या हॉटेलमध्ये रविवारी जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील अरुण जोरसिंग धाडी हा आला होता. हॉटेल मॅनेजर अनिल नाना राठोड यांच्यासोबत बील देण्याच्या कारणावरुन अरुण जोरसिंग धाडी याने वाद घातला. या वादातून अरुण याने हॉटेल मॅनेजर अनिल यास हातातील कड्याने डोळ्याजवळ मारहाण केली. यात अनिल राठोड हा जखमी झाला. तसेच अरुण याने पुन्हा शिवीगाळ करत तुला मारायला अजून माझे मित्र आणतो अशी धमकीही यावेळी अनिल राठोड याला दिली. याप्रकरणी अनिल राठोड याने दिलेल्या तक्रारीवरुन अरुण जोरसिंग धाडी याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.

Protected Content