बसमधून महिलेची पर्स लांबवितांना तीन महिलांना रंगेहात पकडले !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरजई नाका भडगाव रोडजवळ बसमधील प्रवाशी महिलेची पर्स जबरी हिसकावून पळ काढणाऱ्या तीन महिलांना नागरीकांच्या मदतीने रंगेहात पकडले आहे. तिघांना चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आशा समाधान चौधरी (वय-२८) रा. मालेगाव जि.नाशिक या महिला १७ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चाळीसगाव भडगाव बसमधून प्रवास करीत होत्या. बसमधे असतांना एका महिला चोराने  आशा चौधरी यांच्या हातातील पर्स हिसकावून बसमधून उतरत पळत सुटली. तिच्या सोबत इतर दोन महिला देखील होत्या. पर्स लांबविल्यानंतर आशा चौधरी यांनी आरडाओरड केली. तेव्हा नागरीकांनी तिघा महिला चोरांचा पाठलाग करून पकडले व चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी तिघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.

Protected Content