फैजपूर प्रतिनिधी । येथील खंडोबाची यात्रा संपूर्ण भारतात ही यात्रा प्रसिद्ध आहे ही यात्रा यंदापासून सात दिवस असणार असल्याची माहिती खंडोबा वाडी देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेचे आयोजन खंडोबा देवस्थान येथे आज ८ रोजी दुपारी करण्यात आले होते. यावेळी महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज
पत्रकार परिषदेत म्हणाले की, खंडोबा महाराजांची यात्रा ही सर्वधर्मसमभावाने भव्यदिव्य व भरगच्च अशी भरविली जाते. यात्रेपरिसरात एकूण देवस्थान तर्फे ३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यात्रेत कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्वयंसेवक ही नेमणूक करण्यात आले आहे तसेच यात्रेनिमित्त फैजपूर नगरपालिकेतर्फे दिवसातून तीन वेळा स्वच्छतेची मोहीम राबवण्यात येत आहे यापूर्वी ही यात्रा ४ दिवस चालत होती यंदापासून ही यात्रा सतत सात दिवस सुरू राहणार असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले उद्या दि ९ रोजी होळीच्या पहिल्या दिवशी खंडेराव महाराज देवस्थानात सकाळी सात वाजता खंडेराव महाराज यांचा अभिषेक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले तर येत्या १० मार्चला यात्रेनिमित्त खंडोबा महाराज भंडारा उधळण अश्र, वस्त्र,अर्पण सोहळा आदि कार्यक्रम होणार असल्याचे पुरूषोत्तम दास महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले वया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी हे व महापूजा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते तसेच खंडोबा महाराज यात्रा शुभारंभ माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते होईल.त्याचप्रमाणे वश्र अर्पण सोहळा खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते होईल व शस्त्र अर्पण सोहळा माजी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते होईल तर अश्र अर्पण सोहळा पुणे येथील नामदेव भाऊ ढाके यांच्याहस्ते आणि व्याख्यानमाला उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ एस एस पाटील,शकुंतला विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश गुरव आदी उपस्थित होते