प.वि.पाटील विद्यालयात रंगली शिक्षकांची जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षक म्हणजे एक सर्व कलागुण संपन्न व्यक्तिमत्व , आपल्या दैनंदिन अध्यापनात त्याच्या कला तो विद्यार्थ्यांमधून पहात असतो व आपले समाधान मिळवत असतो यातच त्याला कधीतरी असेव वाटते की आपण सुद्धा आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करावी व अभिव्यक्त व्हावं पण ते सहज शक्य होत नाही आणि त्याच अनुषंगाने सर्व शिक्षक बांधवाना आपल्या अंगी असलेली कला सादर करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील तसेच ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हास्तरीय शिक्षक गीतगायन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.

सर्वप्रथम केसीई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.केसीई सोसायटी चे शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी बडे अच्छे लगते है… हे पहिले गीत उदघाटन प्रसंगी सादर करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास 45 स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी आपली नोंदणी केलेली होती.यात विविध प्रकारची देशभक्तीपर गीते , सिनेगीते , प्रबोधन गीते , अहिराणी गीतांसह स्वरचित गीते यावेळी स्पर्धकांनी सादर केली. मराठी हिंदी गीतांनी सर्व परिसर अतिशय चैतन्यमय झाला. आम्ही जे तोमार , मधूबन मे राधिका , मेरे नैना सावन भादो , जिंदगी एक सफर हाई सूहाना, लाई वि ना गयी या गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली प्रसंगी जळगांव जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) विजय पवार साहेब यांनीही सुंदर से गीत यावेळी सादर केले तर

प्रथम क्रमांक – मिलिंद किसन तायडे – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय , चाळीसगांव गीत – आनंद या जीवनाचा.
द्वितीय क्रमांक – पंकज छगन पाटील – भाऊसाहेब शा.शी.पाटील माध्य.विद्या.चहार्डी गीत – एकच राजा इथे जन्मला ..
तृतीय क्रमांक – गणेश चंद्रसिंग लोडते – सद्गुरू प्राथमिक विद्या. खेडी जळगांव गीत – मै हु प्रेम रोगी …
उत्तेजनार्थ प्रथम – योगेश मधुकर जोशी – वि.प्र. डॉ.अविनाश आचार्य विद्यालय जळगांव गीत – आई अमोल माया
उत्तेजनार्थ द्वितीय – मनोज रमेश भालेराव – प्रगती प्रा.विद्यामंदिर जळगांव गीत- आज मौसम बडा बेईमान है

विजेत्या स्पर्धकांना मा. विजय पवार साहेब उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याहस्ते रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण दुष्यंत जोशी तसेच इशा वडोदकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व संपूर्ण नियोजन उपशिक्षक योगेश भालेराव तसेच चंद्रकांत कोळी यांनी मुख्या.रेखा पाटील तसेच मुख्या.प्रणिता झांबरे तसेच सुपरवायझर नरेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. तर उपशिक्षक डी.ए.पाटील, सुजाता, फालक, स्वाती पाटील, पराग राणे, सुनील नारखेडे, सुधीर वाणी यांनी विशेष सहकार्य केले.

Protected Content