पोलिसांची धडक कारवाई : शस्त्रसाठा जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवून एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली असून मोठा शस्त्रसाठा पकडला आहे.

 

जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाई बद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, एमआयडीसी हद्दीत दरोड्याच्या प्रयत्नातील स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर (१९), निशांत प्रताप चौधरी (१९, दोन्ही रा.शंकरराव नगर), पंकज चतुर राठोड (१९, रा.तुकारामवाडी, जळगाव), यश देवीदास शंकपाळ (१९, हरीओम नगर, आसोदा रोड) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडूनपिस्टल, तीनजिवंत काडतुस आदी जप्त करण्यात आले. यासोबत एलसीबीने अडावद येथे रमेश घुमरसिंग भिलाला या तरूणाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एक गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

यासोबत, भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परीसरातून ललित तुलसीदास खरारे (२२), जितेंद्र आनंद बोयत (२३) व पवन किसन खरारे (२७, सर्व रा.वाल्मीक नगर, भुसावळ) या आरोपीकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस, दोन मोबाईल, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तालुक्यातील कंडारी येतून मयुर मोरे व कल्पेश राजू मोरे यांच्याकडील गावठी पिस्तूल, पाच तलवारी, एक काडतूस जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली. भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी बोलताना दिली आहे.

Protected Content