पाण्याच्या मोटारीच्या वायरची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव खुर्द परिसरात असलेल्या डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीवरील पाण्याच्या मोटारीची तब्बल ६० मीटर लांबीची कॉपर वायर चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव खुर्द परिसरात डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आहे. या महाविद्यालाला पाणीपुरवठा करण्‍यासाठी महाविद्यालय परिसरातच एक विहीर असून त्यावर पाण्याची मोटार बसविण्यात आली आहे. महाविद्यालयाचा कर्मचारी मंगळवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे मोटार सुरु करण्यासाठी विहिरीवर केला असता, याठिकाणच्या मोटारीची कॉपरची वायर गायब असल्याचे दिसून आले, सर्वत्र शोध घेवूनही वायर न मिळाल्याने महाविद्यालयाचे कर्मचारी डॉ शैलेश चंद्रसेन तायडे यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन ५ हजार रुपये किंमतीची कॉपर वायर चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नूर खान हे करीत आहेत.

Protected Content