पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील भिमनगरमधील लुंबिनी बुध्द विहारात ७ फेब्रुवारी रोजी कोटी कुळांची माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त रमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपिठावर भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष भाऊराव पवार, वंचित बहुजन आघाडीचे अनिल लोंढे, संतोष कदम, दादा भिवसेने, सावित्री पवार, माया केदार, आयु. निकम, संविधान आर्मीच्या छाया निकाळजे, तालुकाध्यक्ष हिरालाल सोनवणे, किशोर बागुल, लखन वाघ, नाना महिरे, आकाश बनसोडे, शंकर सोनवणे, आयु. खेडकर यांचेसह कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सामुहीक प्रार्थ घेउन मान्यवरांनी माता रमाईंच्या त्यागमय जीवनातील विविध घटनांची माहीती देत त्यांच्या जिवन चरिञावर प्रकाश टाकला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.