पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी मेंदूज्वर लसीकरण शिबीर

हज यात्रेला जाणाऱ्या ९१ भाविकांनी मेंदूज्वरची घेतली लस

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।   शहरातील  माजी नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी, सामाजिक कार्यकर्ते राजु अलाउद्दीन शेख, माजी नगरसेवक फिरोज मिस्तरी, सैय्यद मुख्तार अली यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेंदूज्वर लसीकरण शिबिर शहरातील कसाली मोहल्ला किल्ला चौक येथील अक्सा हॉल येथे घेण्यात आले

 

या शिबिरात अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगांव, शिरपूर येथील एकुण ९१ भाविकांनी लाभ घेतला. पवित्र हज यात्रेसाठी जाण्यासाठी मेंदूज्वरची लस घेणे बंधनकारक असते हे लस नाही घेतली तर सौदी अरेबिया येथील जद्दा विमानतळ प्रवेश नाकारण्यात येतो.  ही लस जिल्हास्तरावर असते परंतु मागील काही वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांच्या प्रयत्नाने अमळनेर येथे शिबिर आयोजित करण्यात येतो आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविकांना सोयीचे होतो. लसीकरण शिबिरात माजी आमदार साहेबराव पाटील, जि प सदस्या जयश्री पाटील यांच्यासह आदिंनी भेट दिली. डॉ ताडे, डॉ विलास महाजन,सह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळ देऊन अनमोल सहकार्य केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content