परसाडे उपसरपंचपदी सुलेमान तडवी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील  परसाडे गावाच्या उपसरपंचपदी ग्रामविकास एकता पॅनलचे सुलेमान हाजी कान्हा तडवी यांचा दणदणीत विजय मिळविला आहे.

 

परसाडे ग्रामपंचायतची सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणुक नुकतीच पार पडली आहे.  या निवडणुकीत माजी सरपंच नजमा मजीत तडवी व पॅनल प्रमुख रमेश सावळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत या ग्रामविकास एकता पॅनलला सर्वाधीक ९ पैकी  ६ जागा मिळवुन बहुमत मिळवले आहे.  परसाडे ग्रामपंचायतच्या कार्यालयात लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक मजित अरमान तडवी यांच्या, मार्गदर्शनाखाली उपसरपंच निवडीची प्रक्रीया पार पडली.

यात उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सरपंच गटाचे उमेदवार रोशन सुभान तडवी यांना ९ पैक्की अवघे तिन मते मिळाली तर नजमा तडवी गटाचे उमेदवार सुलेमान हाजी कान्हा तडवी यांना सहा मते मिळवुन दणदणीत विजय मिळवला.  याप्रसंगी सर्व विजयी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यायांचे स्वागत करण्यात आले.  याप्रसंगी नवनिर्वाचीत सरपंच मिना राजु तडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य मुन्ना ईस्माईल तडवी , योगीता सतिष तायडे ,कल्लुबाई ईनुस तडवी, रमजान छब्बु तडवी, बाबासाहेब शंकर भालेराव, रमेश सोना  सावळे, रोशन सुभान तडवी, शकीला महेमुद तडवी व मदीना सुभेदार तडवी असे सर्वं ग्रामपंचायत सदस्य व यांच्यासह माजी सरपंच हुसेन सायबू तडवी , अरमान तडवी , मधुकर गिरधर भालेराव, जहाबाज महेबुब तडवी यांच्या सहमोठया संख्येत ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. संपुर्ण निवडणुक प्रक्रीया शांततेत पार पाडण्याकामी ग्रामसेवक मजीत अरमान तडवी यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच पोलीस नाईक राजेन्द्र पवार आणि त्यांचे सहकारी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content