परमेश्वर प्राप्तीसाठी मनुष्याचा देह आहे – हभप श्री योगीराज महाराज गोसावी

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री क्षेत्र फैजपूर येथे सामूहिक श्री विठ्ठल नामजप व नामसंकीर्तन महोत्सवात द्वितीय पुष्प साक्षात महाविष्णूचा अवतार संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे वंशज ह. भ.प. श्री योगीराज महाराज गोसावी यांनी गुंफले.

शरण शरण एकनाथा… पायी माथा ठेवीला.. नका पाहू गुणदोष.. झालो दास पायाचा या संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांवर लिखित संत शिरोमणी तुकोबारायांचा अभंग आपल्या अमोघ वाणीतून व सुश्राव्य शब्दांनी भक्त मंडळी समोर विशद केला.

नाथ महाराजांच्या 450 व्या जयंतीच्या औचीत्याने पहिल्या सप्ताह कार्यक्रमाचा मान फैजपूर गावाला मिळाल्याचा आनंद यावेळेस त्यांनी बोलून दाखवला. तुकोबांच्या अभंगाच्या माध्यमातून संत एकमेकांसमोर शरणागती पत्करतात, ज्याला कशाचीही गरज नसते तोच शरण जातो, जीवाने जडा ला शरण जाऊन काय अर्थ ? यापेक्षा जीवाने देवाला शरण गेले पाहिजे, असा उपदेश करण्यात आला. देहाच्या एकूण नऊ अवस्थेतून जाताना परमात्म्याचे स्मरण व नामजप हेच पुण्यप्राप्ती व मोक्षप्राप्तीचे द्वार असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. श्री योगीराज महाराज गोसावी यांनी यावेळेस केले.

नाथ महाराज हे एक द्रष्टा संत होते. त्यांनी धर्मांतरांची सत्यता लोकांना पटवून दिली व भगवंताला किंवा संतालाच शरण जाण्यात मानवी जीवनाचे भले असल्याची महती पटवून दिली.

ज्ञानोबा पासून निळोबारायांपर्यंतच्या एकूणच संत वाङ्मयात ६० टक्के संतवांडमय हे फक्त नाथ महाराजांचे असून भानुदासाची कुळी… महाविष्णूचा अवतार… क्षेत्र प्रतिष्ठान… वसती गोदावरी तीर… ओवाळू आरती स्वामी एकनाथा…! हे आपल्या संत परंपरेचे सर्वोच्च शिरोमणी असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. श्री योगीराज महाराज गोसावी यांनी केले.

Protected Content