मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – न्यायालयाकडून फक्त भाजपच्याच लोकांना दिलासा कसा मिळतो, यासाठी विशीष्ट व्यवस्था आहे का ? असा प्रश्न शिवसेना खा. संजय राउत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून खा.राऊतांच्या विरोधात बार काऊन्सीलकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘विक्रांत आयएनएस’ या युध्द नौकेच्या संग्रहालय उपयोगासाठी निधी जमा करण्यात आला. या निधी अपहार प्रकरणी दाखल तक्रारीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना न्यायालयात दिलासा मिळाला होता. दिशा सॅलिअन प्रकरणी राणे यांच्यापासून मुंबै बँक प्रकरणापर्यंत ते आयएनएस विक्रांतच्या निधीचा घोटाळा करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात? या सर्वाना दिलासा मिळाल्यानंतर राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर बार काऊन्सीलकडून खा. संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून प्रतिसाद कर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही नावे नमूद आहेत.
उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीं यांच्या विरोधात खोटे, त्यांच्या प्रतिष्ठेला कलंक किंवा बाधा उत्पन्न होईल असे अवमानजनक आरोप केल्याप्रकरणी इंडियन बार असोसिएशनने ‘न्यायालयाचा अवमान’ केल्याप्रकरणी खा. संजय राऊत यांच्यासोबतच इतरांविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यातीलच एक आमदार संजय कुटे हे फडणवीसांचे उजवा हात म्हणून ओळखले जातात. ते एका ठिकाणी असं बोलले की, ज्या गोष्टी आम्ही पोलीस आणि प्रशासनाकडून करुन घेऊ शकत नाही, त्या आम्ही न्यायालयाकडून करुन घेत असतो. न्यायालयात आमचे वजन आहे. आता हे कोणत्या प्रकारचे वजन आहे. यासह किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाल्यानंतर मी १०० टक्के सांगतो हा दिलासा घोटाळाच आहे. तो विशिष्ट राजकीय पक्षाच्या आणि विशिष्ट विचारांच्या लोकांनाच मिळावा यासाठी न्याययंत्रणेमध्ये एक व्यवस्था काम करते आहे. असे राउत यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर वक्तव्य केले होते. शिवाय न्यायव्यवस्थेवर कोणाचा तरी दबाव आहे असे वाटते. कारण न्यायव्यवस्थे काही विशेष लोक बसवण्यात आले आहेत. जे दिलासे देण्यासाठीच कोणाच्या तरी सूचनेनुसार ते लोक काम करतात, असेच सुरु राहिले तर या देशाची लोकशाही, न्यायव्यवस्था आणि पर्यायाने स्वातंत्र्यच धोक्यात येईल, असेही खा. राउत यांनी म्हटले होते.