यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नांदेड हुन भुसावळ येथे येणारी मुक्कामी बससेवा ही प्रवाशांच्या आणी वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्या एसटी बसचा प्रवास हा यावल पर्यंत वाढवावा अशी मागणी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक यांच्याकडे तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत यावल तालुका प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या नेतृत्वाखाली यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांची भेट घेवुन एसटी आगारातुन प्रवाशांना भेडसावणार्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रवाशी संघटनेच्या वतीने परिसरातील व तालुक्यातील अनेक विद्यार्थी नांदेड या ठीकाणी आपले वैद्यकीय शिक्षणासाठी जात असतात त्यामुळे यावल आगारातुन थेट नांदेड जाण्यासाठी बससेवा नसल्याने प्रवासांचे विद्यार्थी पालकांचे हाल होतात. नांदेड एसटी आगाराची बस ही भुसावळ पर्यंत मुक्कामी येते त्या बसला नांदेड ते यावल पर्यंत मुक्कामी करण्यात आल्यास प्रवासांची होणारी मोठी गैरसोय व आर्थिक भुर्दंड टाळता येईल तरी एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाच्या वतीने प्रवाशांच्या हितासाठी तात्काळ नांदेड ते भुसावळ पर्यंत येणारी एसटी बस सेवा यावल पर्यंत वाढवावी अशी मागणी केली आहे.
यावेळी शिष्टमंडळात जगदीश कवडीवाले, पप्पु जोशी , संतोष धोबी ,सागर देवांग , शरद कोळी , ईलीयास खान, आदीवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसैन तडवी आदींचा समावेश होता.