नवनियुक्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे अमळनेर रक्तचळवळीला रक्तदान करून दिले बळ

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी अमळनेर रक्तचळवळीला रक्तदान करून एका प्रकारे बळ दिले आहे. त्यांनी आतापर्यंत ३३ वेळा रक्तदान केले आहे.

यावेळी नंदवाळकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, स्पर्धा परिक्षा अवघड नसते, मनात भिती न बाळगता अभ्यास केला पाहीजे. आपण युवांना मार्गदर्शन करु बाहेरील वक्ते आणू व सर्वच स्थरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु असेही त्यांनी सांगून लवकरच विद्यार्थ्यांसाठी जी मदत लागेल ती मी करेल, अमळनेरात रक्तचळवळ सोशल मिडियाचा वापर सुयोग्य होत आसल्याने युवांचे कौतुक केले. यावेळी युवा मित्र परिवाराचा वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा मित्र परिवाराचे दिनेश तेवर, तुषार सोनार, शैलेश पाटील, राहुल बडगुजर, राहुल आहिरे, सौरभ पाटील, भावेश साळुंखे, परेश पाटील, राहुल पाटील, निखील चव्हाण, मनोज शिंगाणे, धनू चौधरी, राकेश अभंगे, राहुल कंजर, प्रथमेश भोसले, सोनू मोरे व अक्षय लांडगे उपस्थित होते. हितेश बेहेरे व गणेश पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content