धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे राहणाऱ्या ५० वर्षीय प्रौढ व्यक्तीचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

चाळीसगाव शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामदास काळू सुरे (वय 50 रा.पिशोर ता.कन्नड जि. संभाजीनगर हल्ली मुक्काम खडके तालुका चाळीसगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार 26 मे रोजी दुपारी रामदास सुरे हे चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागी मृत्यू  झाला. या संदर्भात हिरापूर रेल्वेचे उपप्रबंधक यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय मालचे करीत आहे.

Protected Content