धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृध्द महिलेचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा उड्डाण पुलाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साबेराबी जहूर कुरेशी (वय-५९) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे.

 

रामानंदनगर पोलीसांकडून मिळालेली माहीतीनुसार, साबेराबी कुरेशी या वृध्द महिला शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात दोन मुल व सुनांसह वास्तव्याला होत्या. लग्नातील कार्यक्रमात कामासाठी नेहमी जात होत्या. नेहमीप्रमाणे गुरूवार १५ जून रोजी सकाळी ११ वाजता त्याच्या लग्न कार्यालयात कामाला गेल्या. त्यानंतर त्या घरी परतत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास  पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळून जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरूवातीला अनोळखी म्हणून रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. घटनास्थळी काही नागरीकांनी मयत वृध्द महिलेला ओळखले, साबेराबी कुरेशी हे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या मुलगा जुबेर कुरेशी याने मयताची ओळख पटविली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शुक्रवारी १६ जून रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला व अजिज शहा करीत आहे.

Protected Content