धावत्या रेल्वेखाली आल्याने अज्ञात व्यक्ती जागीच ठार

पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान भरधाव रेल्वे समोर येवुन एका अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याचे घटना १३ मे रोजी रात्री २१:४५ मिनिटांनी घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन तपासी पोलिस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती मोरे यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ मे रोजी रात्री २१:४५ वाजता पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३६९/१३/१५ नजीक मुंबईहुन लखनौच्या दिशेने जाणाऱ्या २२१२१ लखनौ ए. सी. एक्सप्रेस समोर येवुन एका ३० वर्षीय (अंदाजे वय) इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटने पुर्वी मयत इसम हा रेल्वे समोर दिसल्यानंतर लखनौ एक्सप्रेसच्या लोकोपायलट जे. एस. बुट्टरशाहु यांनी जोराने हाॅर्न वाजवुन देखील सदर इसम हा बाजुला झाला नाही. व भरधाव वेगात असलेल्या एक्सप्रेसखाली येवुन त्याच्या जागीच मृत्यू झाला. घटने प्रकरणी लोकोपायलट यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक यांना वाॅकी – टाॅकी द्वारे कळविले. स्टेशन प्रबंधक यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये खबर दिल्यानंतर पो. हे. काॅं. निवृत्ती मोरे हे रुग्णवाहिका चालक दिनेश पाटील यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक दिनेश पाटील यांच्या मदतीने अनोळखी इसमाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मयत इसमाचे खिश्यात शेंदुर्णी ते पाचोरा असे एस. टी. बस चे तिकीट आढळुन आले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती मोरे हे करीत आहे. मयत अनोळखी इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन देखील निवृत्ती मोरे यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content