धरणगावच्या भवानीमाता मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचे काम पूर्ण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील भवानी मातेच्या मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून यामुळे भाविकांना सुविधा मिळणार आहे.

 

धरणगाव शहरातील जागृत देवस्थान भवानी मातेच्या भक्तांना मध्यंतरी अडचणींचा सामना करावा लागत होता. मातेच्या दर्शनाकरिता धरणगावातील असंख्य भक्त नवरात्रीत व दररोज जात असतात भवानी मातेच्या भक्तांना पावसाळ्यात मंदिरात जाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत असे. म्हणून भवानी मातेच्या भक्तांचे शिष्टमंडळ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना भेटले होते. आणि पालकमंत्र्यांनी भवानी मातेच्या भक्त मंडळाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते.

 

दरम्यान, यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला. यामुळे मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचे काम अखेर पूर्ण झाले असून यामुळे भक्तांची गैरसोय टळणार आहे.

Protected Content