दुकानासमोरून दुकानदाराची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीपेठ परिसरातील महालक्ष्मी डेअरी समोर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गुरुवार २२ जून रोजी रात्री ११  वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील विवेकानंद नगर परिसरात सुरेश पेशुराम आईदासानी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे नवी पेठेत महालक्ष्मी डेअरी दुकान आहे. ते दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. २१ जून रोजी रात्री ११ वाजता सुरेश आई दासणे हे त्यांची दुचाकी (एमएच १९ बीसी २७) ने त्यांच्या दुकानासमोर आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंग करून लावली. दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर सुरेश आईदासानी यांनी दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला. परंतु कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरुवार २२ जून रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.

Protected Content