दशमाता मंदीर फोडून देवीच्या दागिन्यांसह दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला !

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात असलेल्या दशमाता मंदीराची भींत फोडून देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटीतील रोकड असा एकुण २ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल शिवारातील नागदुली शिवारात बारा ज्योर्तिलिंग आणि दशमाताचे मंदीर आहे. १५ जून रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दशमाता मंदीराची भींत फोडून आत प्रवेश करत देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटी फोडून त्यातील रोकड असा एकुण २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी १६ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. मंदीराचे पुजारी विलास महाजन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एरंडोल पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून घटनेचा पंचनामा केला. पुजारी विलास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

Protected Content