मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज सत्तासंघर्षाच्या लागलेल्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.

आज निकालानंतर दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यात पहिल्यांदा फडणवीस यांनी या निकालावर भाष्य केले. यात त्यांनी सुप्रीम कोर्टाने निकालातून अतिशय स्पष्टपणे राज्य सरकार हे घटनात्मक चौकटीत असल्याचे सांगितले. तर शिवसेनेच्या मालकीचा ताबा कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला देखील कोर्टाने मान्य केल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले.

याप्रसंगी फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, ठाकरे म्हणतात की मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला. मात्र गेल्या निवडणुकीत आमच्या सोबत लढून नंतर सरकार दुसर्यांसोबत स्थापन केले तेव्हा नैतिकता कुठे गेली होती ? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर ठाकरे यांनी नैतिकतेतून नव्हे तर भितीतून राजीनामा दिल्याची टिका देखील त्यांनी केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.