तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड; तीन जणांवर गुन्हा दाखल

जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अंगणात कचरा टाकण्याच्या कारणावरून एका तरुणाला तीन जणांकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून मोबाईल फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १७ जून रोजी रात्री  ११ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विलास विकास सुरवाडे (वय-३०) रा. पळासखेडा ता.जामनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १७ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अंगणात कचरा टाकला, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे रोमल मिलिंद लोखंडे, रमाबाई मिलिंद लोखंडे आणि कोमल मिलिंद लोखंडे या तीन जणांनी लोखंडी रॉडने विलास सुरवाडे याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विलासला गंभीर दुखापत  झाली तसेच त्याचा खिशातील मोबाईल फोडून नुकसान केले. याप्रकरणी विलास सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोमल मिलिंद लोखंडे, रमाबाई मिलिंद लोखंडे आणि कोमल मिलिंद लोखंडी या तिघांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहे.

Protected Content