तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली गावातील स्वयंम हॉटेल समोरून तरूणाची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र संतोष पवार (वय-२२) रा. वाघ नगर, जळगाव हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव तालुक्यातील भादली गावातील स्वयंम हॉटेल कामाच्या निमित्ताने मच्छिंद्र पवार हा १८ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आलेला होता. दुचाकी (एमएच १९ डीएस ६३५१)ने आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकी हॉटेल समोर पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्याची पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर मच्छिंद्र पवार याने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवार २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.

Protected Content