तरुणाला मारहाण करून लुटले

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बॉम्बे बेकरी नजीक एका तरुणाला अज्ञात चार जणांनी रस्ता अडवून बेदम मारहाण केली व खिशातील मोबाईल हिसकावून दुचाकीवर पळून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी ११ जून रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत विठ्ठल भगत (वय-३०, रा. कल्याण) हा तरुण कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या बॉम्बे बेकरी नजीक शनिवारी १० जून रात्री ११ वाजता अज्ञात चार जणांनी रस्ता अडविला. त्याच्याजवळ असलेला मोबाईल जबरी हिसकावून दुचाकीने पळून गेले. हा प्रकार घडल्यानंतर रविवारी ११ जून रोजी दुपारी २ वाजता यशवंत भगत याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

Protected Content