जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डॉ.अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर डॉ.सुजाता गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.

जी 20 अंतर्गत इटीडब्ल्यूजी ची बैठक झाली त्या बैठकीत ऊर्जा संसाधनाचा भविष्यातील धोका लक्षात घेऊन या विषयाकडे समाजाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याने सर्व महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे शिक्षण विभागाच्या तसेच राजकीय सेवा योजना संचालक कबचौउमवि जळगाव आदेशान्वये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागात ऊर्जा स्त्रोत संवर्धन किंवा पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयावर विद्यार्थ्यांना जनजागृती करण्याच्या हेतूने वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या मा. प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.सुजाता गायकवाड वक्ते म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर बोलताना पर्यावरणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम तसेच पर्यावरण संवर्धन काळाची गरज यावर मनोगत व्यक्त करताना ‘झाडे लावा, झाडे जगवा ‘या संदेशाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वृक्षांचे महत्त्व, पाण्याचे महत्व, या ऊर्जा स्रोतांचे महत्त्व, प्लास्टिकचे दुष्परिणाम, या घटकावर प्रकाश टाकला तसेच समाजात पर्यावरण विषयी जनजागृती करण्याचे विद्यार्थ्यांनींना आवाहन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रीमती रत्नप्रभा महाजन तसेच प्रा.आर.पी. मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रा. योगेश कोळी यांचे तांत्रिक साह्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.दिपक किनगे यांनी केले. कार्यक्रमास रासेयो एककाच्या स्वयंसेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.