झोपेत असलेल्या वृध्‍द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंगणात खाटेवर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी धुम स्टाईल लांबविल्याची घटना घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लिलाबाई बुधा साळुंखे (वय-७०) रा.कोळन्हावी ता. यावल या वृद्धा महिला पती, मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे १९ जून रोजी रात्री ९.३० वाजता त्या जेवण करून अंगणात खाटेवर झोपल्या होत्या. त्यांच्या बाजूला त्यांचे पती देखील दुसऱ्या खाटेवर झोपलेले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरी तोडून धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली. महिलेने आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत दोन्ही चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले होते. या संदर्भात महिलेने मंगळवार २० जून रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content