झुलेलाल उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत नागदेव तर कार्याध्यक्ष योगी हिंदुजा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची जयंती १० एप्रिलला असल्याने या जयंतीनिमित्त पारोळ्यात जय झुलेलाल सिंधी नवयुवक मंडळाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उत्सव समिती अध्यक्षपदी प्रशांत नागदेव तर कार्याध्यक्षपदी योगी हिंदुजा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

समितीची कार्यकारीणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली. यात सचिव बन्सीलाल हिंदुजा, खजिनदार किशोर नंदवानी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून विक्रमकुमार लालवाणी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नवयुवक मंडळाचे सदस्य कमल लालवाणी,मुकेश नंदवानी, संजय हिंदुजा, सन्नी नागदेव,हरेश हिंदुजा, गिरधर लुल्ला, अन्नु हिंदुजा, मोहित वालेचा, अजय लालवाणी, भविष्य हिंदुजा,मयंक हिंदुजा, अंकुश हिंदुजा,हर्षल नंदवानी, पियुष वालेचा,
विजय रहेजा, राहुल हिंदुजा, ऋशी हिंदुजा, तुषार हिंदुजा,यांच्या सह इतर सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सांगण्यात आले कि, यंदा आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची जयंती १० एप्रिल बुधवारी असुन या प्रसंगी समाजातील सर्व प्रतिष्ठान दिवसभर बंद राहतील तसेच समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले असून त्यात प्रामुख्याने सकाळी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान त्यानंतर पारोळा कुटीर रुग्णालयात फळ वाटप त्यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे दुपारी समाजासाठी आम भंडारा सांयकाळी शहरातील युवा नेतृत्वांच्या हस्ते भगवान झुलेलाल यांची महाआरती करून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल तसेच सांयकाळी देशात सुख शांती समृद्धी नांदो तसेच समाजात सदैव एकता राहो म्हणून देवाला साकडे घालण्यात येईल.
अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख विक्रमकुमार लालवाणी यांनी दिली.

Protected Content