जुन्या वादातून तरूणाला दुचाकीवर ढकलले; जखमी तरूणाचा मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जुना वाद उरकुन काढत एकाला दुचाकीवर ढकलून दिल्याने झालेल्या दुखापतीत तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकाला पोलीसांनी अटक केली असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल शांताराम शेळके (वय-२३) रा. वाल्मीक नगर, भुसावळ असे मयताचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगल शेळके हा आपल्या परिवारासह भुसावळ शहरातील वाल्मिक नगरात वास्तव्याला आहे. १६ जून रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास जुन्या वाद उरकून काढत संशयित आरोपी राहूल तुकाराम पाडळे (वय-२८) रा. फेकरी ता.भुसावळ याने फेकरी उड्डाण पुलाजवळ असतांना मंगल शेळके याच्या झटापट झाली. त्यानंतर मंगलला दुचाकीवर जोरात ढकलून दिले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी मयताचा भाऊ आकाश शेळके याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी राहूल तुकाराम पाडळे यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश कुळकर्णी करीत आहे.

Protected Content