जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; सात जण ताब्यात

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जुगार अड्ड्यावर भडगाव पोलीसांनी छापा टाकून सात जणांवर कारवाई केली असून ३६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथे बेकायदेशीररित्या जुगार सुरू असल्याचे गोपनिय माहिती भउगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीसांनी दुचाकी, मोबाईल आणि रोकड असा एकुण ३६ हजार ५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डोमाळे, पोकॉ विलास पाटील, स्वत्नील चव्हाण यांनी केली. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल चव्हाण करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content