जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब”अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शिरसोली रोडवरील जी.एस. रायसोनी महाविद्यालयात  “टोस्टमास्टर्स क्लब”अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

 

“टोस्टमास्टर्स” ही एक उत्कृष्ट वक्ता घडवणारी चळवळ असून सुसंगत बोलण्याची कला आणि विचार करण्याची सवय ही सरावाने तयार होते. नुसत्या बोलण्याचा सराव केला तर “आज या ठिकाणी उपस्थित माननीय” च्या पुढे प्रगती नाही. विचार करून, मुद्देसूद बोलणे आपले म्हणणे दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे याचा सराव महत्वाचा. या अनुषंगाने विध्यार्थ्याच्या व्यक्तीमहत्वाचा विकास व्हावा या हे हेतूने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब” ची स्थापना करण्यात आली आहे. नुकतेच या क्लबच्या समन्वयिका प्रा. प्रिया टेकवाणी याच्या मार्गदर्शनाखाली “टोस्टमास्टर्स क्लब”अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी चर्चेत, सर्व पॅनेल सदस्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रामाणिकपणा राखण्याची गरज अधोरेखित केली व आम्हा सर्वांसाठी ही एक उत्तम शिकण्याचे व्यासपीठ  असल्याचे नमूद केले. यावेळी साहिल वर्मा हा विध्यार्थी “बेस्ट स्पिकर  अवॉर्ड”, रजा सय्यद या विध्यार्थ्याला “बेस्ट रोलप्लेयर”, मोईन शेख या विद्यार्थ्याला “बेस्ट एवलुएटर” तर गौरव पाटील या विध्यार्थ्याला “बेस्ट इम्प्रोम्प्टू” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर चर्चासत्राचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.

Protected Content