जिल्ह्यातील ४ डीवायएसपींच्या बदल्या

राज्याच्या गृह विभागाने काढले आदेश; बदलीच्या ठिकाणी तातडीने रूजू होण्याचे आदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चार विभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्याच्या आदेश राज्याच्या गृह विभागाने सोमवारी २२ मे रेाजी रात्री उशीरा आदेश पारित केले आहे. तर जिल्ह्यात नव्याने तीन अधिकारी येणार असल्याचे नमूद केले आहे.

 

राज्याच्या गृह विभागाने सोमवारी २२ मे रोजी रात्री उशीरापर्यंत बदल्यांच्या आदेशात राज्यातील १०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. दरम्यान बदलीच्या ठिकाणी तातडीने रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात जळगावचे विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांची पाचोरा विभागात तर अमळनेरचे राकेश जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखचे डीवायएसीपी भास्कर डेरे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदीन बदली झाली आहे. दुसरीकडे भुसावळचे विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी विक्रांत गायकवाड येणार आहेत.. शिवाय मुक्ताईनगर येथे राजकुमार शिंदे यांची निुयक्ती करण्यात येत असून जळगावच्या संदीप गावीत यांच्या जागी चंद्रपुरचे विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content